दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), केंद्र फलटण यांच्या वतीने ‘दीपावली पहाट व धन्वंतरी पूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दीपावली हा सर्वात मोठा सांस्कृतिक व अध्यात्मिक उत्सव आहे. हा उत्सव ज्ञानाचा, प्रकाशाचा, मांगल्याचा आणि नवनिर्मितीचा असल्याने या आनंद पर्वाची सुरुवात ‘दिवाळी पहाट’ या संगीतमय कार्यक्रमाने संस्थेतर्फे होणार आहे. यावेळी मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम ‘गीत सुमनांजली’ बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली येथील गायकवृंद सादर करणार आहेत.
याप्रसंगी धन्वंतरी पूजन व सन्मान सोहळा होणार असून धन्वंतरी जयंतीनिमित्त वैद्यकीय क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले सेवाभावी डॉ. प्रमोद रतनलाल शहा (वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, भारत सरकार) यांचा सन्मान फलटणकर नागरिकांच्या वतीने करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६.१५ वा. नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे होणार असून या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) – केंद्र फलटण यांनी केले आहे.