दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२३ । गुहागर । बौद्ध धम्म परंपरेनुसार वर्षावास कार्यक्रमाचा कालखंड सुरू झाला असून; वर्षा म्हणजे पाऊस व वास म्हणजे निवास, पावसाळ्यात देशाटन करताना बौद्ध भिक्षूंना मौसमी आजार, विषारी प्राणी व नसर्गिक आपत्ती यांचा त्रास होऊ नये तसेच भिक्षु ज्या क्षेत्रातून जातील तेथील स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून तथागत गौतम बुद्धांनी बुद्धभिख्खूना पावसाळ्यात स्तूप, विहार याठिकाणी वास करून तेथील उपासक-उपसिकांना धम्म उपदेश करण्याचे आदेश दिले, तथागत बुद्धांनी पहिला वर्षावास ऋषीपत्तन तर शेवटचा वर्षावास वैशाली या ठिकाणी केला असून त्यांच्या जीवनकाळात त्यांनी एकूण ४६ वर्षावास केले आहेत त्यामुळे बौद्ध धम्मात वर्षावास कार्यक्रमाला अन्यन्यसाधारण महत्व आहे; म्हणून परंपरा जपण्याच्या उद्देशाने बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने विभागानिहाय वर्षावास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, याच अनुषंगाने गिमवी विभाग क्र. ३ आणि बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. २४ मौजे मुंढर (गाव व मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १७ जुलै २०२३ रोजी एक दिवसीय वर्षावास कार्यक्रम निमित्त पूज्य भन्ते विमलबोधी यांच्या धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन जैतवन बुद्धविहार, मुंढर येथे सकाळी ठीक १०:०० ते सायंकाळी ५:०० या कालावधीत गिमवी विभाग गटक्रमांक १३ चे अध्यक्ष मा. राजू मोहिते साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी सूत्रसंचालन विभाग चिटणीस निलेश गमरे, स्थानिक शाखा चिटणीस राजेश नारायण मोहिते करतील तर प्रास्ताविक विभाग अधिकारी मनोज गमरे व पाहुण्यांचे स्वागत स्थानिक शाखा अध्यक्ष दर्शन तुकाराम गमरे हे करतील, सदर प्रसंगी बौद्धजन सहकारी संघाचे गाव शाखा, तालुक्यातील मान्यवर मंडळी, विश्वस्त मंडळ, विभाग क्र. ३ चे सर्व पदाधिकारी, सभासद, सदस्य, सर्व विभागनिहाय कमिटी, सर्व विभागातील शाखापदाधिकारी, महिला मंडळ, सभासद, सदस्य, कार्यकर्ते, संस्कार समितीचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी कार्यक्रमास उत्स्फूर्तपणे हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे विभाग क्र. ३ च्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात निलेश गमरे यांनी म्हंटले आहे.