वेदांता उदयपूर वर्ल्ड म्युझिक फेस्टिवलचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२२ । मुंबई । वेदांत उदयपूर वर्ल्ड म्युझिक फेस्टिवल या सेहरद्वारे संकल्पित व निर्मित आणि राजस्थान टूरिझमने आपल्यासाठी आणलेल्‍या भारतातील सर्वात मोठ्या जागतिक संगीत महोत्सवाच्या सहाव्या पर्वाचे आयोजन उदयपूर येथे १६ ते १८ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या पर्वाच्या कर्टन रेजर कार्यक्रमाचे आयोजन ९ डिसेंबर २०२२ रोजी नजर बाग, ताज फतेह प्रकाश पॅलेस, उदयपूर येथे पार पडले.

यावर्षी, वेदांत उदयपूर वर्ल्ड म्युझिक फेस्टिवलने कलाकारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वादन करण्याची संधी देऊन विसर पडलेल्या संगीत वाद्यांची आवड निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. युनेस्कोनुसार संरक्षित परंपरा – सारंगीवर विशेष भर देण्यात आला आहे. आशा आहे की, जगभरातील तरुणांना त्याबाबत रूची निर्माण होईल आणि ते दिमाखात त्यामध्ये प्रगती करू शकतील.

सेहरचे संस्थापकीय संचालक संजीव भार्गव म्‍हणाले, “आम्हाला प्रेक्षकांसाठी उदयपूर म्युझिक फेस्टिवलचे ६वे पर्व घेऊन येण्याचा आनंद होत आहे. आम्ही सर्व परफॉ‍र्मिंग आर्टिस्ट्सना होस्ट करण्यास आणि नवीन प्रतिभांना मंच देण्यास उत्सुक आहोत. आम्हाला सारंगी सारख्या विसर पडलेल्या संगीत वाद्याप्रती पुन्हा आवड निर्माण करण्याप्रती योगदान देण्याचा अभिमान वाटतो. आम्हाला खात्री आहे की, फेस्टिवलचे हे पर्व मागील पर्वांप्रमाणेच उत्साहवर्धक व मनोरंजनपूर्ण असेल.’’


Back to top button
Don`t copy text!