दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२२ । बारामती । एनआयपीएम पुणे विभागाच्या वतीने शनिवार दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी विद्याप्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इंजिनियरींग इंन्स्टीटयुट बारामती येथे “व्यवसायातील स्थिरतेसाठी शिस्त आणि कामगार कायद्यातील धोरणांचा आढावा” घेण्यासाठी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
या परिसंवादात कामगार कायदे विषयांतील तज्ञ मार्गदर्शक आणि विधिज्ञ आदित्य जोशी विधिज्ञ प्रकाश क्षिरसागर मानवसंसाधन विभागातील अनुभवी मार्गदर्शक डॉ. सुनिल कोदे (व्हाईस पसिडेंट बिल्लो इंडिया) श्री सलील मिडे (व्हाईस प्रेसिडेंट एचआर भारत फोर्ज) श्री. बाळासाहेब सोनवणे (जीएम एचआर दिल्ट ग्राफीक्स) यांनी या परिसंवादात सहभागी होत सर्वस्पर्शी मार्गदर्शन केले..
डॉ. अभिजित शहा (व्हाईस प्रसिडेंट आयआर अॅडमीन भारत फोर्ज) यांनी परिसंवादाच्या सुत्रधाराच्या भुमिकेतुन उद्योजक, मानव संसाधन विभागातील अधिकारी, व्यवस्थापन महाविद्यालयातील प्राध्यापक, व्यवस्थापनाचे विद्यार्थी यांच्या मनातील सर्व शंका आणि कायद्यातील संभाव्य अडचणी यांचा सारासार विचार करून, कायदा आणि त्यातील निरनिराळ्या संज्ञा ईत्यादी संदर्भात मान्यवरांकडुन विविध विषयांवर भाष्य करीत मार्गदर्शन घडवुन आणण्याची महत्वाची भुमिका यावेळी पार पाडली.
या कार्यक्रमासांठी बारामती, कुरकुंभ जेजुरी, इंदापुर, फलटन ई ठिकाणच्या कंपन्यांमधिल एचआर व्यवस्थापक यांच्यासह ९० पेक्षा जास्त अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनआयपीएम पुणे विभागाचे चेअरमन श्री. सदाशिव पाटील यांनी केले. अशा उपक्रमांची आवश्यकता आणि महत्व विद्याप्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इंजिनियरींग इंन्स्टीटयुट बारामतीचे प्राचार्य डॉ. राजन बीचकर यांनी अत्यंत सुंदरपणे विषद केले..
श्री किरण चौधरी, जीएम ईआर अॅण्ड अॅडमीन यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन एनआयपीएम पुणे विभागाचे चेअरमन श्री. सदाशिव पाटील असो. व्हा. प्रेसिडेंट भारत फोर्ज (कॅम) बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कॉटन किंग चे डायरेक्टर श्री. गायकवाड साहेब यांची एनआयपीएम पुणे विभागाच्या बारामती उपविभागाच्या चेअरमनपदी नियुक्तची घोषणा पुणे विभागाचे चेअरमन श्री. सदाशिव पाटील यांनी यावेळी केली. या वेळी एनआयपीएम पुणे विभागाचे जनरल सेक्रेटरी श्री. प्रकाश बिमलखेडकर आणि व्हाईस चेअरमन सौ.. हेमांगी धोकटे हे उपस्थित होते.