दैनिक स्थैर्य | दि. १९ एप्रिल २०२३ | फलटण |
अनिरुध्द उपासना फाऊंडेशन, अनिरुध्दाज अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट संचलीत सद्गुरू श्री अनिरुध्द उपासना केंद्र, कोळकी, ता. फलटण, जि. सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.०० वाजेदरम्यान महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर कोळकी ग्रामपंचायत कार्यालयावरील सभागृहात होणार आहे.
फाऊंडेशनचे रक्तदान शिबिराचे हे सलग सहावे वर्ष आहे. रक्तदात्यांनी रक्तदानासाठी जोतिरामसिंह दंडिले (मो. ८३०८०१२४६६), प्रमोदसिंह कर्वे (९७३०२८९१४४), संजयसिंह तागडे (९८२२०३९४२१), राजूसिंह कांबळे (९७८६२६९२४३), उत्तमसिंह पेटकर (९८२२६१९५२८), नरेंद्रसिंह कांबळे (९७६६०२५३४१), श्रीकांतसिंह वाघ (७५०७८९८९९९), गोपाळसिंह जाधव (९९२२९५६५६७), प्रा.डॉ. अनिलसिंह टिके (९४२१११९६५२), डी. एम. नाळे सर (९५९५७९२३८७), समीरसिंह डुबल (८७६७४२६४५२) यांच्याशी संपर्क साधावा.
रक्तदान कोणी करावे?
- वय १८ ते ५५, सद़ृढ स्त्री-पुरूष
- हिमोग्लोबीन १२.५ ग्रॅम % व पुढे
- वजन ४५ किलो अगर जास्त
- ब्लडप्रेशर वयानुसार यथायोग्य
- रक्तदान करणार्यास कोणताही धोका नाही
सद़ृढ आरोग्यासाठी रक्तदान करणे फायदेशीर आहे. कारण आपल्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. यापैकी केवळ ३५० मि.ली. रक्त घेतले जाते. रक्तदानानंतर ७ तासात शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात. म्हणजे रक्तदानामुळे शरीरात नवचैतन्य निर्माण होते. आपल्या रक्तदानामुळे चार जीव वाचतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्तदानासारखे जगात दुसरे श्रेष्ठ दान नाही.
आजपर्यंत फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून १२०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. त्यातून आजपर्यंत ३०० हून अधिक गरीब व गरजूंना विनामूल्य ब्लड उपलब्ध झाले आहे.