आयआयएम नागपूरमध्ये ‘नीडरपणे जगणे’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ नोव्हेंबर २०२२ । नागपूर । आयआयएम नागपूर येथे नुकतेच (२१ नोव्हेंबर) ‘नीडरपणे जगणे’ या विषयावर परस्परसंवादात्मक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्‍तकांचे लेखक व वेदांत व्याख्याते आचार्य प्रशांत यांना या चर्चासत्रासाठी आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. भीमराया मेत्री यांनी मान्यवर वक्त्यांचे स्वागत व परिचय करून दिला.

आचार्य-जी हे समाजसुधारक, पर्यावरणवादी, आयआयटी व आयआयएम या दोन्हीचे माजी विद्यार्थी आणि माजी नागरी सेवक देखील आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि दैनंदिन अडथळ्यांना तोंड देताना आपल्याला निर्भय राहण्यापासून व आपली खरी क्षमता जपण्यापासून कोणत्‍या गोष्टीचा अडथळा येतो यावर चर्चा केली. वेदांताच्या दृष्टिकोनातून ‘नीडरपणे जगणे’ समजून घेण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांकरिता संवाद म्हणून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आचार्य प्रशांत यांच्या प्रतिसादांनी या समस्येच्या मुळाशी जाऊन विद्यार्थ्यांना साध्य करता येतील अशा महत्त्वपूर्ण गोष्‍टींचा अधिक स्पष्‍टपणे व धैर्याने सामना करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

आयोजक समितीचे सदस्य रोहित राजदान म्हणाले, “आयआयएम नागपूरकडून मिळालेल्या आमंत्रणाबाबत आनंद झाला. आचार्य प्रशांत यांनी विद्यार्थ्यांना धैर्याने गौरवशील जीवन कसे जगावे हे दाखवून दिले.’’

आचार्य प्रशांत हे आयआयटी, आयआयएम आणि एम्स कॅम्पससह विविध विद्यापीठांमध्ये नियमित वक्ते आहेत. विद्यार्थ्यांनी करिअर आणि नातेसंबंधांबद्दल अनेक प्रश्न विचारले. जीवनाचा अर्थ व उद्देश आणि आनंदी व शांत जीवनाचे रहस्य यांबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!