श्रीमंत रामराजेंच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन; माजी नगरसेविका सौ. वैशाली चोरमले यांचा उपक्रम


दैनिक स्थैर्य । दि. ०२ सप्टेंबर २०२२ । फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ. वैशाली दादासाहेब चोरमले यांनी केले आहे.

भव्य घरगुती गौरी सजावट स्पर्धेमध्ये विजेत्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ₹5,555/- रोख व पैठणी वितरित करण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास ₹3,333/- व पैठणीचे वितरण करण्यात येणार आहे. तृतीय क्रमाकांच्या विजेत्यास ₹2,222/- व पैठणीचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासोबतच उत्तेजनार्थ विजेत्यांस पैठणीचे वितरण करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येकास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

सदरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपल्या घरी गौरी सजावट केल्यानंतर दिलेल्या वॉटस्अप क्रमांकावर सजावटीचा जास्तीत जास्त ६० सेकंद म्हणजेच केवळ एक मिनिटीचा स्पर्धक सहभागी असलेला व्हिडीओ शुट करुन दि. ५ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ८.०० वाजेपर्यंत पाठवायचा आहे. व्हिडीओ दिलेल्या मर्यादित वेळेचाच असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा मोठ्या व्हिडीओचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही. व्हिडीओ सोबत आपले संपूर्ण नांव, पत्रव्यवहाराचा पत्ता सुद्धा दिलेल्या व्हॉटस्अप क्रमांकावर पाठविणे बंधनकारक आहे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!