
स्थैर्य ,सातारा, दि, १: शांतिदुत परिवार व आयएमए असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने जागतिक महिला दिन व शांतिदुत परिवाराच्या अध्यक्षा विदया विठ्ठल जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गुरुवार दि.04 मार्च 2021 रोजी सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत आयएमए हाँल,पोवई नाक्यालगत,सातारा याठिकाणी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजक सुजित आंबेकर यांनी दिली आहे.
सध्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना शासनाकडून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले असून या आवाहनाला शांतिदुत परिवाराचे मार्गदर्शक व माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डाँ.विठ्ठल जाधव यांच्या सुचनेनुसार व जागतिक महिला दिनाचे व शांतिदुत परिवाराच्या अध्यक्षा विदया जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्याच्या कानाकोप-यात रक्तदानाचे महत्त्व नागरिकांना होण्याकरीता शांतिदुत परिवार व व आएमए असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने भव्य रक्तदान शिबीराचे गुरुवार दि.04 मार्च 2021 रोजी सातारा येथील आयएमए हाँल,पोवई नाक्यालगत आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीराचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शांतिदुत परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.