दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२२ । सातारा । तोफखाना रजिमेंटच्या सेवानिवृत्त माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तसेच अवलंबितांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी मंगळवार दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत महासैनिक भवन, मल्टीपर्पज हॉल, टी.सी.पी.सी. करंजे नाका सातारा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.