दैनिक स्थैर्य । दि. १२ सप्टेंबर २०२२ । मुंबई । शिक्षण हे बौद्धजन पंचायत समितीचे हृदय आहे म्हणून शिक्षण हाच ध्यास मनात धरून बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने सागरी प्रांतातील विद्यार्थ्यांकरता प्रतिवर्षी वार्षिक अंदाज पत्रकात शिक्षण विभागावर जास्तीत जास्त खर्च करून विद्यार्थ्यांना घडवण्याचे उदात्त कार्य समितीच्यावतीने करण्यात येत आहे, सालाबादप्रमाणे बौद्धजन पंचायत समितीने त्याचसोबत सलग्न शिक्षण समिती यांच्या विद्यमाने सागरी प्रांतातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदविका या शैक्षणिक क्षेत्रात ६०% व त्याहून अधिक गुण प्राप्त झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवार दि. १८ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ठीक ५:३० वाजता इंदू मिलचे प्रणेते, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, भोईवाडा, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी उत्तमराव खोब्रागडे (माजी IAS अधिकारी), विनोदजी मोरे (उपसभापती, बौ. पं. समिती), लक्ष्मण भगत (कार्याध्यक्ष, बौ. पं. समिती), किशोर मोरे (माजी कार्याध्यक्ष, बौ. पं. समिती) हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, तर सूत्रसंचालनाची धुरा राजेश घाडगे (सरचिटणीस बौ. पं. समिती) सांभाळतील तर प्रास्ताविक राजेश पवार (अध्यक्ष, शिक्षण समिती, बौ. पं. समिती) करतील व आभार प्रदर्शन अशोक मोहिते (चिटणीस, शिक्षण समिती, बौ. पं. समिती) करतील.
सदर कार्यक्रमास प्रामुख्याने बौ. पं. समितीचे उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, एच. आर. पवार, मनोहर मोरे, चंद्रमणी तांबे आणि व्यवस्थापण मंडळाच्या विविध समित्यांचे प्रमुख, पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, तरी प्रत्येक शाखेतील पालकांनी आपल्या पाल्यासह उपस्थित रहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हाहन जनसंपर्क व प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष रमेश जाधव व चिटणीस विश्वास मोहिते यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने काढलेल्या परिपत्रकात केले आहे.