
दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२२ । सातारा । जागतिक मानसिक आरोग्य दिन व सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे नियोजन स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयामार्फत करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
दि. 12 ऑक्टोंबर 2022 रोजी एलआयसी कार्यालय, सातारा येथील कर्मचारी वर्गासाठी ताण तणाव व्यवस्थापन कार्यशाळा तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी शिबीराचे आयोजन. 13 ऑक्टोंबर रोजी शिक्षक व विद्यार्थी वर्गासाठी तणाव मुक्त कार्यशाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र हेळवाक ता. पाटण येथे मेघा कॅम्पचे आयोजन. 14 ऑक्टोंबर रोजी आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा येथे नागरिकांसाठी व एमआयडीसी येथील कामगारांसाठी मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रम. 15 ऑक्टोंबर रोजी जिल्हा कारागृह व जिल्हा पोलीस दलामधील कर्मचारी यांच्यासाठी तणाव मुक्ती कार्यशाळा व दि.17 ऑक्टोंबर रोजी सप्ताहाचा समारोप होईल.