दैनिक स्थैर्य | ३० सप्टेंबर २०२२| फलटण | श्री सदगुरू हरिबाबा महाराजांचा १८२ व्या प्रकट दिन आणि रथोत्सव सोहळा बुधवार दि. ०५ ऑक्टोबर रोजी दसर्याच्या मुहूर्तावर सायं. ०६ वा. श्री सदगुरू हरिबुवा साधु महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे.
या निमित्त दि.०५ ऑक्टोबर रोजी सायं. ०७ ते १० या वेळेत “ॐ दत्त चिले ॐ” भजनी मंडळाची भजन सेवा होणार आहे. गुरूवार दि. ०६ ऑक्टोबर रोजी महाभिषेक, चंदुकाका वादे यांचे हरिचरित्र वाचन, पंचक्रोशीतील सांप्रदायिक भजनीमंडळाची भजनसेवा, कै. विशाल भुजंगराव भोईटे यांच्या स्मरणार्थ भजन स्पर्धा, प्रवचन, सांगली येथील संजय व संदीप कोळी यांची स्वराजंली भजनसेवा होणार आहे.
शुक्रवार दि. ०७ ऑक्टोबर रोजी सकाळी ०६ वाजता महाभिषेक सकाळी १० वाजून १० मिनीटांनी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रथांचे पूजन व प्रस्थान होणार आहे. सायं. ०७ वाजता आरती व महाप्रसाद असा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
नगर प्रदक्षिणा श्रींच्या मंदिरापासून सुरू होऊन मलठण नंतर फलटण शहरातून उघडा मारूती मंदिर, शिवाजी महाराज पुतळा, मेटकरी गल्ली, शिंपी गल्ली, श्री राम मंदिर, गजानन चौक, मारवाड पेठ, शुक्रवार पेठ, शंकर मार्केट, बुरूड गल्ली ते श्रींचे मंदिर अशी निघणार आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सदगुरू हरिबुवा साधु महाराज देवस्थान ट्रस्ट, श्री सदगुरू हरिबाबा रथोत्सव समिती, “ॐ दत्त चिले ॐ” यांनी केले आहे.