फलटणमध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. 07 सप्टेंबर 2023 | फलटण | जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद व फलटण तालुका क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण तालुका शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे; अशी माहिती फलटण तालुका क्रीडा अधिकारी सुमित पाटील यांनी दिली.

यामध्ये दि. 11 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय खो – खो स्पर्धेचे आयोजन हे श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल (घडसोली मैदान) येथे संपन्न होणार आहेत.

दि. 11 सप्टेंबर रोजी 13 सप्टेंबर रोजी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन मुधोजी महाविद्यालय येथे संपन्न होणार आहे.

दि. 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर रोजी जाधववाडी येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कुल येथे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 25 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर रोजी कबड्डी स्पर्धेचे आयोजन हे प्रेमलाताई चव्हाण हायस्कुल येथे संपन्न होणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!