दैनिक स्थैर्य | दि. ६ जुलै २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील उद्यानकन्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जि. प. प्राथमिक शाळा, सोनवडी खुर्द येथे गुरुवार, दि. ४ जुलै २०२४ रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला होता.
या स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. हा उपक्रम सरपंच श्रीमती शालन सूर्यवंशी, उपसरपंच शरद सोनवलकर, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली शिंदे, शिक्षिका वैशाली चांगण, ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वाती पवार, विद्यार्थी पालक श्री. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत पार पडला.
या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. जे. व्ही. लेंभे व समन्वयक प्रा. ए. डी. पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी अभंगराव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या गोसावी क्रांती, गलांडे शिवानी, माळी अस्मिता, खराडे वर्षा, काशीद अमृता, शिंदे स्नेहल यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.