शिवकालीन युध्द कला मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिराचे आजपासून आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलटण विभागाच्या वतीने दि. १६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान रोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत शिवकालीन युध्द कला मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मुले, महिला-मुली, माता-भगिनींवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत, आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी हे युध्दकला प्रशिक्षण अत्यंत आवश्यक बनले आहे अथवा ती काळाची गरजच आहे. भावी पिढी सद़ृढ, निरोगी व बलशती बनविण्यासाठी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेकडून करण्यात आले आहे.

या शिबिरात भारतीय व्यायाम काठी, भाला, पट्टा प्रशिक्षण व ज्ञानप्रबोधनपर चिंतनवर्ग यांचा समावेश आहे. या शिबिरात प्रवेशासाठी १०० रूपये फी असून नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी ९४२३९९०२३८, ९५०३६५७९३३, ९०९६६०८०६१ व ७४२०९०२५२९ या मोबाईलवर संपर्क साधावा.

हे प्रशिक्षण शिबिर हणमंतराव पवार हायस्कूल, स्वामी विवेकानंद नगर, फलटण येथे आयोजित केले आहे.


Back to top button
Don`t copy text!