दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण, ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेकुरण बंगला, सांगवी येथे गुरुवार, दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा व क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये खो-खो, लंगडी आणि १०० मी. धावणे यांचा समावेश होता.
या स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. बनसोडे सर आणि तळेकर सर यांच्या उपस्थितीत पार पडला. या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर अणि कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. डी. पाटील सर आणि प्रा. जे. व्ही. लेंभे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या सायली म्हस्के, शिवांजली माने, पूनम राऊत, सई झगडे, सोनाली कदम, सुप्रिया ठोंबरे यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.