ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे २९ व ३० ऑगस्ट रोजी आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑगस्ट २०२२ । सातारा । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने 29 व 30 ऑगस्ट 2022 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

रोजगार मेळाव्यामध्ये 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय (सर्व ट्रेड) कुशल, अर्धकुशल कामगार अशा प्रकारची 260 पेक्षा अधिक रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. तरी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!