दैनिक स्थैर्य | दि. २९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन या योजनांबाबत माहिती नागरिकांना मिळावी, योजनांच्या अंमलबजावणीत त्यांचा सहभाग मिळावा, या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जलरथाचे आयोजन केले आहे. ११ मार्चअखेर हा जलरथ तालुक्यातील १३१ गावांत जाणार आहे.
जलरथाचा प्रारंभ पंचायत समिती येथे करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी श्री. चंद्रकांत बोडरे साहेब, सहायक गटविकास श्री. कुंभार साहेब, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे अधिकारी श्री. भोईटे साहेब, सहायक प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, बी. आर. सी. पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जलजीवन मिशन, जलयुक्त शिवार व स्वच्छ भारत मिशन यांचा प्रचार व प्रसिद्धी करण्याच्या उद्देशाने हा जलरथ तालुकाभर जाणार आहे. मुंबई येथील मल्टिक्रिएशनतर्फे ही योजना राबविली जात आहे. रथ गावात आल्यावर पदाधिकारी, ग्रामस्थांतर्फे रथाचे स्वागत करण्यात येईल. यावेळी समन्वयकांमार्फत याची माहिती देण्यात येईल.