
दैनिक स्थैर्य । 14 जुलै 2025 । फलटण । कृषी महाविद्यालय, फलटण अंतर्गत ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यक्रम 2025-26 अंतर्गत कृषीदुतांनी दर्याचीवाडी (ता. फलटण) येथील शेतकर्यांशी मधमाशीपालन या विषयावर गटचर्चेचे आयोजन केले.
या चर्चेत गावातील प्रमुख शेतकरी, तरुण वर्ग सहभागी झाले होते.
कृषीदुतांनी मधमाशीपालनाचे फायदे, त्याची पद्धत, लागणारे साहित्य, उत्पादनातील वाढ, आणि उत्पन्नवाढीची संधी यावर माहिती दिली. चर्चेच्या माध्यमातून शेतकर्यांनी देखील आपले प्रश्न विचारले व स्वतःचे अनुभव सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रम समन्वयक सौ. निलीमा धालपे, प्रा. नितिशा पंडित व विषय मार्गदर्शक सौ. प्रा. माधुरी पवार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमात कृषीदूत कृष्णकांत जगताप, हर्षल काळभोर, ओमप्रकाश गडकर, दिग्विजय लोखंडे, पियुष बुरुड, प्रशांत कदम आणि स्मित बारेला यांनी सक्रिय सहभाग घेतला.