दैनिक स्थैर्य । दि. २३ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयच्यावतीने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे दि. 28 डिसेंबर 2022 पर्यंत आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये कॅरम, शुटिंग बॉल, बेसबॉल, रग्बी, त्वायक्वांदो, हॉकी व्हॉलीबॉल, लॉन टेनिस, बॉल बॅडमिंटन, फूटबॉल, बॅडमिंटन, सॉफ्ट बॉल, जलतरण, स्क्वॅश, वेटलिफ्टिंग, थ्रो बॉल, योगासने, मल्लखांब, कुस्ती, सिकई मार्शल आर्ट, नेटबॉल, रोलर स्केटिंग/ हॉकी, डॉजबॉल, कब्बडी, ज्युदो, रोलबॉल, हॅण्डबॉल, कराटे , खो-खो, बुध्दीबळ, बॉक्सिंग, मॉडर्न पेटॅथलॉन, टेनिक्वाईट, किक बॉक्सिंग, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक, सायकलींग, आट्यापाट्या, आर्चरी, सेपक टकरा, मैदानी आदी खेळांच्या स्पर्धा होणार आहेत.
शालेय स्पर्धांना उपस्थित राहण्यासाठी सकाळी 9 वा. पर्यंत स्पर्धेत सहभाग नोदविता येणार आहे. तसेच सायकलिंग स्पर्धेकरिता सकाळी 6 वा. पर्यंत सहभाग नोंदविणे बंधनकारक राहील. वजनी गटातील स्पर्धांची वजने स्पर्धेच्या दिवशी सकाळी 9 ते 10 या वेळेत होतील. स्पर्धा कालावधी व स्पर्धा स्थळाबाबत ऐनवेळी बदल झाल्यास या कार्यालयामार्फत वेबसाईटवर सूचना देण्यात येईल. तथापि, त्या-त्या खेळांच्या संघाने,संघ व्यवसथापकाने, तसेच क्रीडा शिक्षकाने याबाबत स्पर्धा प्रमुखांशी प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वी किमान खात्री करुन घ्यावी. शालेय स्पर्धेत गोंधळ, गदारोळ इ. बाबी करणाऱ्या संघाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल, तसेच अशा संघांना आगामी तीन वर्षासाठी सहभागी होण्याबाबत जिल्हा क्रीडा परिषद, सातारा निर्बंध घालू शकते, याची नोंद घ्यावी. क्रीडा स्पर्धेसाठी स्वत:चे साहित्य असणे आवश्यक आहे. अधिक संपर्कासाठी तालुका क्रीडा अधिकारी हितेंदे खरात मो.क्र. 9850214864, क्रीडा अधिकारी सुनिल कोळी 9284319226, क्रीडा मार्गदर्शक दत्तात्रय माने 8888851622 यांच्याशी संपर्क साधावा.