दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑक्टोबर २०२२ । रत्नागिरी । बौद्धजन पंचायत समिती ता. रत्नागिरी संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. २२ ते २४ ऑक्टोबर पर्यंत सकाळी ७:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत तालुकाशाखा अध्यक्ष आयु. प्रकाश रा. पवार यांच्या अध्यक्षतेखाली, माध्यमिक शिक्षक पतपेढी हॉल, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे बौद्धजन पंचायत समिती, मुंबई अतिरिक्त सरचिटणीस रविंद्र रा. पवार, संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश भा. पवार, चिटणीस मनोहर बा. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास बौद्धजन पंचायत समितीचे रत्नागिरी तालुका शाखेचे खजिनदार मंगेश सावंत, चिटणीस सुहास कांबळे, सह चिटणीस नरेंद्र आयरे, उपाध्यक्ष विजय आयरे तसेच संस्कार समितीचे चिटणीस रविकांत पवार, सभापती संजय आयरे आदी मान्यवर व तालुकाशाखा, गावशाखा, उप समित्या यांचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
बौद्ध धम्माच्या जडणघडणीत, प्रचार, प्रसार तसेच बौद्धांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचे संपादन करण्यात बौद्धचार्यांचे योगदान नेहमीच अग्रगण्य राहिले आहे, तथागत गौतम बुद्ध, बुद्धघोष, नागार्जुन आदी विद्वान बौद्धचार्यांची विचारधारा पुढे नेण्यासाठी बौद्धचार्य प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे, यामुळे अधिकाधिक जणांनी या शिबिरात सहभागी होऊन बुद्ध धम्माची पताका दाही दिशांत फडकविण्याच्या उद्दात्य कामास योगदान द्यावे असे आव्हाहन संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश भा. पवार यांनी केले आहे.