
दैनिक स्थैर्य । दि. १३ मार्च २०२३ । मुंबई । बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित ९६ व्या चवदार तळे सत्याग्रह निमित्त महाड क्रांतीदिन महोत्सव मा. आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. २० मार्च २०२३ रोजी सकाळी ठीक १०:०० ते २:०० या वेळेत क्रांतीभूमी, महाड येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी घेण्यात येणाऱ्या जाहीर सभेचे अध्यक्षस्थान सभापती मा. आनंदराज आंबेडकर भूषवणार असून, ओ.बी.सी. प्रबोधनकार मारुतीकाका जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंचायत समितीचे उपसभापती विनोदजी मोरे प्रमुख मार्गदर्शक तसेच कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, विधी सल्लागार ऍड. संघराज रुपवते हे प्रमुख वक्ते तर उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, एच. आर. पवार, मनोहर मोरे, चंद्रमनी तांबे, अंकुश सकपाळ, खजिनदार नागसेन गमरे, अतिरिक्त सरचिटणीस विठ्ठल जाधव, रवींद्र पवार, प्रकाश करूळकर हे वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर प्रसंगी सरचिटणीस राजेश घाडगे प्रास्ताविक सादर करतील तर बुद्धवंदना व धार्मिक विधी संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार, चिटणीस मनोहर मोरे व इतर बौद्धाचार्य पार पाडतील.
माणसाला माणूस म्हणून जगता यावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आजन्म लढा दिला त्यातीलच एक महत्वाचा लढा चवदार तळे सत्याग्रह, अमानवीय मनुवादी जातीव्यवस्थेमुळे “पाणी” पिण्याचा अधिकार अस्पृश्यांना नव्हता म्हणून १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास तीन हजार अनुयायांना घेऊन चवदार तळ्यावर पाणी सत्याग्रह केला. त्याच सत्याग्रहा निमित्त सदर महाड क्रांती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, सदर प्रसंगी सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र यांद्वारे सकाळी ९:०० ते ११:०० या वेळेत भीमगीतांचा सादर केला जाईल, तरी सदर कार्यक्रमास सर्व शाखा, त्यांचे पदाधिकारी, सभासद, गाव व तालुका शाखा, संघटना, बौद्धाचार्य, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आले आहे.