दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२२ । मुंबई । समाजातील तळागाळातील दिनदुबळे, गरीब, दुर्लक्षित, शोषित, वंचित, मागास, दलित वर्गातील लोकांना व सर्वच वर्गातील स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार न देणाऱ्या जाचक मनुस्मृतीचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२५ रोजी सार्वजनिक दहन केले त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ व समाजविघाटक वृत्तीचा बिमोड करण्यासाठी बौद्धजन पंचायत समितीच्या विद्यमाने ९५ व्या मनुस्मृती दहन तथा मानव मुक्ती दिनाचे आयोजन रविवार दि. २५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता क्रांतिभूमी, महाड, जिल्हा रायगड या ठिकाणी करण्याचे योजिले आहे.
सदर प्रसंगी बौद्धजन पंचायात समिती सभापती सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपसभापती विनोदजी मोरे व माजी कार्याध्यक्ष किशोरजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस राजेश घाडगे करणार असून, बुद्धवंदना व धार्मिक विधी संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार, चिटणीस मनोहर मोरे आदी बौद्धाचार्य विधिवत पार पडतील व प्रमुख वक्ते कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, विधी सल्लागार ऍड. संघराज रुपवते, वक्ते उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, एच. आर. पवार, मनोहर मोरे, चंद्रमनी तांबे, अंकुश सकपाळ, खजिनदार नागसेन गमरे, अतिरिक्त चिटणीस विठ्ठल जाधव, रविंद्र पवार, प्रकाश करूळकर आदी मान्यवर उपस्थितांस मार्गदर्शन करतील.
सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी व्यवस्थापक मंडळ प्रयत्नशील आहे तरी सदर प्रसंगी सर्व व्यवस्थापक मंडळ सदस्य, सर्व गाव, तालुका शाखा त्याचे अध्यक्ष, पदाधिकारी, सभासद, सदस्य, विविध संघटना, शाखांचे पदाधिकारी, सभासद, सदस्य, बौद्धाचार्य, महिला मंडळ, भीमसैनिक, कार्यकर्ते व तमाम बंधू, भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनुस्मृती दहन व मानव मुक्ती दिन मोठ्या जल्लोषात साजरा करावा अशी विनंती बौद्धजन पंचायत समितीने काढलेल्या परिपत्रकात करण्यात आली आहे.