दैनिक स्थैर्य । दि. 18 फेब्रुवारी 2022 । सातारा । सातारा जिल्ह्यात दि. 19 फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्त जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 मधील कलम 142 (1) मधील तरतुदीनुसार सातारा शहरातील मिरवणूक मार्गावरील सर्व देशी दारु किरकोळ विक्री (सीएल-3), बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-2), विदेशी मद्य विक्री (एफएल-2), परवानाकक्ष (एफएल-3), बिअरबार (फॉर्म ई) व ताडी दुकान टिडी-1 या अनुज्ञप्तीची जागा व विक्री पूर्ण पणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाचे कोणत्याही अनुज्ञप्तीधारकाने उल्लंघन केल्यास त्यांचे विरुध्द मुंबई मद्य निषेध कायदा 1949 व त्या अंतर्गत असलेल्या निमयान्वये योग्य ती कडक कारवाई केली जाईल. तसेच अनुज्ञप्ती बंदच्या कालवधीची नुकसान भरपाई दिली आणार नाही. याची नोद घ्यावी.