
स्थैर्य, सातारा, द. ३१ : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून कोरोना रुग्णांना उपचाराकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटरची गरज पहाता लवकरात लवकर सातार्यात 200 ऑक्सिजन बेड व 50 व्हेन्टिलेटर सुविधांचे जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटर सुरू करण्या संदर्भात राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचे गांभीर्य व गरज ओळखून तत्काळ त्यास मान्यता देत राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना सातार्यात 200 ऑक्सिजन बेड व 50 व्हेन्टिलेटर सुविधांचे जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटर उभारण्यास सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या मागणीनुसार व मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार सातार्यात आता 200 ऑक्सिजन बेड व 50 व्हेन्टिलेटर सुविधांचे जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मान्यतेनुसार जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटर उभारण्याच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करावी, असे राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सूचित केले असून या संदर्भात गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही तत्काळ जिल्हाधिकार्यांना दूरध्वनी करून सातार्यात 200 ऑक्सिजन बेड व 50 व्हेन्टिलेटर सुविधांचे जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटर उभारण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. पुणे येथे ज्याप्रमाणे जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटर सुरू केले आहे त्याची उद्याच्या उद्या आपण स्वत: जावून पहाणी करून सातार्यातील शिवाजी संग्रहालयाच्या इमारतीच्या परिसरात 200 ऑक्सिजन बेड व 50 व्हेन्टिलेटर सुविधांचे जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटरच्या कामास सुरुवात करून 15 दिवसांच्या आत हे सेंटर सुरू होण्यासंदर्भात सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात याव्यात, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सूचित केले आहे.