
दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२२ । लोणंद । लोणंद येथे पालखी सोहळयाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय करण्यासाठी म्हणून लावण्यात आलेले पाळणे आज संध्याकाळी काढून घेणाच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या.
लोणंद येथे पालखीसाठी लावलेल्या पाळण्याविरोधात लोणंदमधील काही प्रतिष्ठित नागरिकांनी जिल्हाधिकारी सातारा तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना पत्रव्यवहार करुन परवानगी न देण्याची मागणी केली होती. तसेच मुख्याधिकारी लोणंद नगरपंचायत यांना सुद्धा पाळण्याना परवानगी देऊ नये असे लेखी पत्र दिले होते. मात्र, तरीही पाळणे उभे करण्याचे काम काम सुरूच होते. मात्र, आज सोमवार दिनांक २७ रोजी सायंकाळी नगरपंचायत कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी यांनी पाळणे लावलेल्या ठिकाणी भेट देऊन संबंधिताना ते काढून घेण्यास सांगितल्यानंतर लोणंदचा पाळणा हवेच झेपावणारच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.