
स्थैर्य, फलटण : जिंती नाका, फलटण येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्या नंतर तेथील प्रतिबंधत्मिक क्षेत्र जाहीर करण्यात आला. रुग्ण संख्या या पुढे वाढू नये म्हणुन फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, फलटण पोलीस उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप पोमण त्या परिसरास भेट देऊन संपूर्ण परिसराची माहिती घेतली व या पुढे कोणकोणत्या उपाय योजना करता येतील, या बाबत तातडीने निर्णय घेण्यात आले. तदनंतर फलटण नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी हे पीपीई किट परिधान करून प्रतिबंधत्मिक क्षेत्रात असणार्या नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी तपासणी करण्याकरिता टीम लगेचच दाखल झाली.