दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यात 7 ते 15 ऑक्टोबर 2021 कालावधीत नवरात्रोत्सव साजरा होत आहे. तसेच दि. 15 ऑक्टोबर 2021 रोजी दसरा (विजयादशमी) व धम्मप्रवर्तन दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच 19 ऑक्टोबर 2021 रोजी ईद-ए-मिलाद साजारा होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी दि. 21 ऑक्टोबर 2021 पर्यत जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी कलम 37(1) अन्वये शस्त्रबंदी आदेश व कलम 37(3) अन्वये जमावबंदीचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यात दि. 9 ते 21 ऑक्टोबर 2021 या कालावधीत खालील कृत्ये करण्यास मनाई करण्यात येत आहे.
शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदूका, सुऱ्या, काठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे.
कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.
दगड किंवा अस्त्र, सोडावयाची अस्त्र, फेकावयाची हत्यार किंवा साधणे बरोबर घेणे, जमा किंवा तयार करणे. व्यक्तीची अगर प्रेते किंवा त्यांचे प्रतिमाचे प्रदर्शन करणे.
सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवणे, सभ्यता अगर निती या विरुध्द असतील अशी किंवा राज्याची असतील अशी किंवा राज्याची शांतता धोक्यात येईल असे प्राधिकाऱ्यास वाटेल अशी भाषणे करणे हावभाव करणे सोंग आणणे अशी मनाईचे उल्लंघन करुन जर कोणताही इसम अशी कोणतीही वस्तु बरोबर घेवून जाईल किंवा कोणत्याही जिन्नस किंवा वस्तु तयार करणे किंवा त्यांचा लोकांत प्रसार करणे. अशा मनाईचे उल्लंघन करुन जर कोणताही इसम अशी केाणताही वस्तु बरोबर घेवून जाईल किंवा कोणताही जिन्नस दाहक पदार्थ किंवा अस्त्र जवळ बाळगतील तर तो कोणत्यही पोलीस अधिकाऱ्याकडून निशस्त्र केले जाण्यास किंवा दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ क्षेपणास्त्र त्यांच्याकडून जप्त केले जाण्यास पात्र असेल आणि अशा तऱ्हेने जप्त केलेली वस्तु दहक पदार्थ, स्फोटक पदार्थ किंवा क्षेपणास्त्र हे सरकार जमा होईल.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37(1)(3) मधील या हुकुमाच्या तरतुदी खालील नमुद केलेल्या इसमांना लागू होणार नाही.
शासनाची सेवा करणारे किंवा नोकरी करण्याच्या कामी ज्यांच्या वरीष्ठांनी निर्दीष्ट केलेवरुन अगर त्यांना कर्तव्याच्या स्वरुपामुळे अशी वर उल्लेखलेल्या पैकी वस्तु धारण करणे किंवा देणे आवश्यक आहे.
ज्यांना शारीरिक दुर्बलतेच्या कारणावरुन जिल्हादंडाधिकारी अगर त्यांना प्राधिकृत केलेले अधिकऱ्यांना, लाठी किंवा लाठी वापरण्यास परवानगी दिली असेल अशी व्यक्ती.
सदरचा आदेश यात्रा, धार्मिक कार्य, लग्न विधी कार्य तसेच अंत्यविधी कार्यास लागू होणार नाही.
ज्या लोकांना शांततेच्या मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करावयाचा असेल त्याचवेळी पोलीस अधिक्षक संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही.