सावरकरांच्या पुण्य स्मरणदिनानिमित आबासाहेब चिरमुले विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा


सातारा – वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देताना उमेश गांधी, नितीन नारकर, वैशाली फडणीस, मयूर नारकर, ईशान नातू, शिक्षक व मान्यवर. (छाया – अतुल देशपांडे, सातारा)

स्थैर्य, 13 मार्च, सातारा : श्री मंगल मारुती मित्र मंडळ मंगळवार पेठ यांच्यावतीने प्रतिवर्षी प्रमाणे स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या पुण्य स्मरण दिनानिमित त्यांच्या जीवनकार्यावर आधारित वक्तृत्व स्पर्धा आबा साहेब चिरमुले विद्या मंदिर या शाळेत घेण्यात आली.दोन गटात झालेल्या स्पर्धेत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना सावरकरांच्या जीवनातील अनेक प्रसंगांची माहिती मिळाली.

या स्पर्धे साठी परीक्षक म्हणून अश्विनी दीक्षित व वैशाली फडणीस यांचे मार्गदर्शन लाभले मंडळाच्या वतीने उमेश नारकर यांनी सावरकर यांच्या मराठी भाषे साठी असलेल्या योगदाना बद्दल माहिती सांगितली.
स्वातंत्रवीर सावरकर विचार मंचचे सुनील मोरे यांनी स्व. अभिजीत माने यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या या स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी देशासाठी समाजासाठी काम करण्याचा संदेश घ्यावा असे सांगितले.
माजी मुख्याध्यापिका वैशाली फडणीस यांनी मंडळाच्या सर्वच उपक्रमांचे कौतुक केले, व अशा स्पर्धा मधून विद्यार्थ्यांच्या विचारांना कला गुणांना वाव मिळतो असे सांगितले.

नितीन नारकर यांनी सावरकर यांच्या विषयी माहिती दिली व विविध विषयांच्या पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्यां नी करावे व आपली प्रगती करावी असे आवाहन केले. स्वातंत्र्य वीर सावरकर विचार मंच यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमा साठी उमेश गांधी, श्री ओसवाल , ईशान नातू , मयुर नारकर उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका सौ तांबे व त्यांचे शिक्षक सहकारी यांनी या कार्यक्रमा साठी विशेष परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!