दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण नगरपरिषदेच्या निवडणुका ह्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. आगामी काही दिवसांमध्ये नगरपरिषदेच्या निवडणूक होणार असल्यानेच विरोधी गटाला फलटण शहराबद्दल विशेष कळवळा निर्र्माण झालेला आहे. नगरपरिषदेवर विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गेले तीस वर्षे एक हाती सत्ता आहे. विरोधी गटाला व विरोधी नगरसेवकांना निवडणूक जवळ आल्यानेच फलटण शहरामधील विविध प्रश्न दिसू लागलेले आहेत. ह्या पूर्वी विरोधी गटामधून स्वतः नगरसेवक म्हणून निवडून येवून किती प्रश्न हातामध्ये घेऊन तडीस नेहले हा विषय चिंतनाचाच ठरणारा आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत युवा नेते प्रीतसिंह खानविलकर यांनी लगावला आहे.
फलटण शहरामध्ये सन १९९१ पासून विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आहे. फलटण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गट सक्षम आहे. राजकारणाचा अड्डा असलेले फलटण शहर हे विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात विकासाच्या मार्गावर मार्गस्त झालेले आहे. फलटण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजे गट सक्षम असून निवडणूक आल्यावरचा प्रसिद्धीचा खटाटोप विरोधकांनी बंद करावा, असेही प्रीतसिंह खानविलकर यांनी स्पष्ट केले.