शेतकरी विधेयकाचा विरोध सुरूच : दिल्लीमध्ये आंदोलनकर्त्यांनी ट्रॅक्टर पेटवले, 5 लोक अटकेत; पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आज शहीद भगत सिंह नगरमध्ये करणार धरणे आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दिल्ली, दि.२८: हरियाणा आणि पंजाबसह देशातील अनेक भागांमध्ये शेतीसंबंधीत बिलांचा विरोध सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी आज दिल्लीमध्ये इंडिया गेटजवळ ट्रॅक्टर जाळले. पंजाब यूथ काँग्रेसचे कार्यकर्ता एका ट्रकमध्ये ट्रॅक्टर घेऊन आले आणि खाली उतरवून त्याला पेटवले. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

दुसरीकडे, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आज शहीद भगतसिंग नगरात धरणे आंदोलन करणार आहेत. ते म्हणतात की शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या राज्यातील कायद्यात दुरुस्तींसह सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे. कर्नाटकातील शेतक्यांनीही आज बंदची घोषणा केली आहे.

बंगळुरूमध्ये शेतकरी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपत आंदोलन केले.

बंगळुरूमध्ये शेतकरी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपत आंदोलन केले.

राष्ट्रपतींनी शेतकरी बिलाला दिली मंजूरी


संसदेत गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांसंबंधीत 3 विधेयके पास झाले होते. याच्या विरोधात राज्यसभेत गदारोळ करणाऱ्या आठ विरोधी खासदारांना सभापती व्यंकय्या नायडू यांनी निलंबित केले होते. यानंतर विरोधी पक्षाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत बिलांवर सही न करण्याची मागणी केली होती. मात्र राष्ट्रपतींनी रविवारी बिलांना मंजूरी दिली.

नवीन विधेयकामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल आणि येत्या काळात सरकार आधारभूत किंमत प्रणाली संपवू शकेल अशी भीती विरोधकांना आहे. मात्र सरकारने म्हटले आहे की आधारभूत किंमत कायम राहील आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन बिले लागू केली गेली आहेत.

बिलांचा निषेध करण्यासाठी अकाली दल एनडीएपासून वेगळा झाला


शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि मोदी मंत्रिमंडळातील अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी शेतकरी बिलाच्या निषेधार्थ राजीनामा दिला होता. शनिवारी अकाली दलानेही एनडीएपासून वेगळे होण्याची घोषणा केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!