मुंबईतील शासकीय, खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्यविषयक ऑन जॉब ट्रेनिंगची संधी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑक्टोबर २०२१ | मुंबई | आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या 18 ते 45 वर्षे वयोगटातील युवक-युवतीना मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय व नामांकित खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्य क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमांमध्ये विनाशुल्क प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंगही देण्यात येणार असून या कालावधीत विद्यावेतन  देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजगता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त छाया कुबल यांनी केले आहे.

सद्यस्थितीत कोरोना प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअर विषयक आवश्यक कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना विशेष प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु केली आहे. प्रशिक्षण योजनेत प्रवेश घेण्याकरिता इच्छुकांनी

https://docs.google.com/forms/d/1TaeY0k_DLf_VWbYkpag4XK6ffngk-QolUogJgeiL3OU/edit या लिंकवरुन नोंदणी करावी. प्रथम येणाऱ्यास  प्रथम  प्राधान्य  राहील. अधिक माहितीकरीता इच्छुक उमेदवारांनी दुरध्वनी क्रमांक (०२२) २२६२६३०३ किंवा ९०२९५६६३९३ यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!