दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । फलटण । सातारा जिल्ह्यामध्ये रॅपिड ऍक्शन फोर्सची एक कंपनी दाखल झाली आहे. 120 जवानांची एक तुकडी सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. मुंबई येथील तळोजा येथून ही टीम आज फलटण शहरात दाखल झाली आहे. फलटण शहरातील सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बारामती चौक, रविवार पेठ व गजानन चौक या परिसरात ही तुकडीने संचलन करण्यात आलेले आहे, याबाबतची माहिती फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी दिली.
रॅपिड ॲक्शन फोर्सची माहीती देण्याबाबत व त्यासोबतच फलटण तालुका शांतता कमिटीची बैठक फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे, रॅपिड ॲक्शन फोर्सचे इन्स्पेक्टर पंकज कुमार, शहर पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, जिल्हा शांतता समितीचे सदस्य मिलिंद नेवसे, जयकुमार इंगळे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रदिप झणझणे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण शहराध्यक्ष पंकज पवार, भाजपाचे राहुल शहा यांच्यासह पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय पोलीस दलाच्या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या काही तुकड्या महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. त्यामधील रॅपिड ॲक्शन फोर्सची एक कंपनी सातारा जिल्ह्यामध्ये तैनाद करण्यात आलेली आहे. त्यामधील एक फोर्स फलटण शहरामध्ये दाखल करण्यात आलेले आहे.