सोलापूर शहरातील नागरिकांनी उतारे, नकाशासाठी गर्दी न करण्याचे आवाहन
स्थैर्य, सोलापूर, दि. 22 : सोलापूर शहर नगर भूमापन कार्यालयात एक खिडकी कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती नगर भूमापन अधिकारी किरण कांगणे यांनी आज दिली.
नागरिकांना मिळकत पत्रिका, सनद, गहाणखत, न्यायालयीन तसेच घरबांधणीसाठी उतारा व नकाशाची आवश्यकता असते. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी एक खिडकी योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे. या खिडकीतून नकलेचा अर्ज घेणे, नकला देणे, घेणे, मोजणी अर्ज स्विकारणे, टपाल घेणे असे कामकाज केले जाईल, असे श्री.कांगणे यांनी सांगितले.
शासन निर्णयाप्रमाणे जनतेची कार्यालयात गर्दी होऊ नये, याकरिता प्रत्येक पेठेसाठी स्वतंत्र खिडक्या कार्यान्वित केल्या आहेत. परिरक्षण भूमापक यांच्या कडे काम असल्यास, जाब-जबाब आणि पंचनाम्यासाठी आणि इतर कामासाठी एक दिवसाआड वार ठरवून दिलेले आहेत. त्यानुसार कामकाज करण्यात येईल, असे श्री.कांगणे यांनी सांगितले.
नागरिकानी निकडीची गरज असेल तरच नगर भूमापन सोलापूर कार्यालयाचे खिडकी योजनेचा लाभ घ्यावा, अर्ज देताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावे, फिजिकल डिस्टन्स ठेवून, निश्चित केलेल्या वेळेत अर्ज करावा, इतराना त्रास होईल, असे वर्तन करु नये, कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क उपलब्ध करुन दिले आहेत. कार्यालयात फवारणी केली जात आहे, असे श्री. कांगणे यांनी सांगितले.
जाब जबाब, पंचनामा आदी कामासाठीचे नियोजन पुढीलप्रमाणे
सोमवार आणि बुधवार खालील परिसरातील नागरिकांनी यावे – न्यू तिऱ्हेगांव, रेल्वेलाईन, लक्ष्मी पेठ, मुरारजी पेठ, अवंतीनगर, उमानगरी, गोल्डफिंच पेठ, मोदी, रामवाडी, दमाणीनगर शुक्रवारपेठ, गुरुवार पेठ, गणेश पेठ, भद्रावती पेठ, दाजी पेठ, स्वातंत्र्य सैनिक नगर, कर्णिक नगर, एकता नगर, पदमानगर, न्यू पाच्छापेठ, दत्त् नगर, उत्तर सदर बझार, दक्षिण सदर बझार, सिव्हील लाईन,
मंगळवार व गुरुवार खालील परिसरातील नागरिकांनी यावे – पश्चिम मंगळवार पेठ, पूर्व मंगळवार पेठ, सिध्देश्वर पेठ, जोडभावी पेठ, रविवार पेठ, दक्षिण कसबा, उत्तर कसबा, बुधवार पेठ, न्यू बुधवार पेठ, भवानी पेठ , सोमवार पेठ, शनिवार पेठ, बेगम पेठ, साखर पेठ, मुस्लिम पाच्छा पेठ, तेंलगी पाच्छा पेठ.