
दैनिक स्थैर्य । दि. २९ मार्च २०२२ । फलटण । कोरोना महामारीच्या कालावधीत बंद असलेली मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली केली आहेत, तथापी अद्याप भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येत नाही. आता कोरोना नियंत्रणात असल्याने गुढीपाडवा दि. २ एप्रिल पासून फलटण शहर व तालुक्यातील भाविकांना सर्व मंदिरांच्या गाभाऱ्यात प्रवेश द्यावा अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना देण्यात आले आहे.
भाजपा अध्यात्म आघाडीचे अध्यक्ष अशोकराव जाधव, भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष नितीन जगताप, पिंटू ईवरे वगैरेंनी प्रांताधिकारी यांना निवेदन देताना पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर गुढी पाडव्यापासून भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी खुले होणार असून त्याप्रमाणे येथेही श्रीराम मंदिर, सद्गुरु हरीबुवा मंदिरांसह शहर व तालुक्यातील सर्व मंदिरे गाभाऱ्यातील प्रवेशासह खुली करावीत अशी मागणी करण्यात आली आहे.