![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2023/02/SHRINIWAS-UPALKAR-NEWS-PHOTO-PANDHARPUR-jpg.webp?resize=780%2C470&ssl=1)
दैनिक स्थैर्य । दि. ०४ फेब्रुवारी २०२३ । पंढरपूर । गेल्या अनेक वर्षांपासुन पंढरपूर शहरातील जिजामाता उदद्दयान व पद्मावती उद्यान ही दोन्ही उद्यानं बंद असल्याने पंढरीतील लहान मुलांना खेळण्यासाठी एकही ठिकाण नाही. कोरोना काळात घरात बसुन कंटाळलेल्या लहान मुलांना खेळण्यासाठी व वयोवृध्द मंडळींना बाहेर मोकळा श्वास घेण्यासाठी आत्ता तरी पंढरीतील ही दोन्हीही उद्याने लवकरात लवकर खुली करावीत यासाठी आत्ता पंढरीतील युवा सेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर हे सरसावले असुन आज त्यांनी पंढरीतील अनेक बालकांना सोबत घेऊन पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकार्यांचे दालन गाठले आणि या बालकांच्या हस्ते निवेदन देत बंद असलेली ही दोन्ही उद्यानं लवकरात लवकर खुली करावीत, अशी मागणी केली.
जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यानात नवीन पध्दतीची खेळणी बसवावीत, बागेची डागडुजी करुन सुशोभीकरण करावे, मिनी रेल्वे सुरु करावी, महिला आणि पुरुषांसाठी शौचालयाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, त्याचबरोबर कारंजे चालु करावेत अशा मागण्या या निवेदनाद्वारे केल्या असुन लवकरात लवकर ही सर्व कामे करुन ही उद्यानं पंढरपुरकरांसाठी खुली करावीत, अशी विनंती केली आहे. जर लवकरात लवकर या मागण्या मान्य केल्या नाहीत तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करु. असा इशाराही श्रीनिवास उपळकर यांनी दिला आहे.
यावेळी युवा सेना शहर समन्वयक स्वप्नील गावडे, युवा उपशहर प्रमुख आतिष काळे, युवासैनिक विशाल डोंगरे, अक्षय ढाळे, महेश हिंगमिरे, संकेत बारसकर, व चि.रुद्र धनवजे, चि.माऊली बारसकर, चि.अथर्व कोरके, चि.विनायक नेहतराव, चि.देवेंद्र कासार, चि.संस्कार फडतरे, चि.वेदांत डोळसे, चि.स्वराज कोरके, चि.आर्यन भोसले, कु.आर्या लोंकलकर, कु.प्राप्ती भिंगारे, चि.अथर्व लोंकलकर आदी बाळगोपाळ उपस्थित होते.