दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑक्टोबर २०२२ । सातारा । मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या 22 वाहनांचा जाहिर ई – लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे दि. 18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे, ही वाहने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा येथील आवारात दि. 6 ते 13 ऑक्टोबर 2022 रोजी कार्यालयीन वेळेत पहाणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. असे कराधान अधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा यांनी कळविले आहे
जाहिर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी दि. 6 ते 13 ऑक्टोबर 2022 या कालावधीत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध असेल. ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर दि. 13 ते 14 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा येथे खटला विभागात सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नावनोंदणी फी रु. 500/- (नापरतावा) आणि रु. एक लाख रकमेचा टुरीस्ट टॅक्सीसाठी तसेच ऑटोरिक्षा, डी. व्हॅन व मोटार सायकलसाठी प्रत्येकी रु. 25000/- रकमेचा अनामत रकमेच्या डिमांड ड्राफ्ट सह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्राच्या प्रती ,नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी व ॲप्रुवल करुन घेण्यासाठी सादर करणे गरजेचे आहे.
ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा. व प्रांत अधिकारी, तहसिलदार, सातारा, वाई, माण, कोरेगांव, महाबळेश्वर, खटाव आणि जावळी तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा यांच्या सुचना फलकावर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे.