लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या वतीने २३ रोजी ओपन दांडिया स्पर्धा


दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
लायन्स क्लब फलटण प्लॅटिनम यांच्या वतीने नवरात्रौत्सवानिमित्त सोमवार, २३ ऑटोबर २०२३ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत ओपन दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा माळजाई मंदिर परिसर, फलटण येथे होणार असून या कार्यक्रमावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लायन्स क्लब प्लॅटिनमच्या वतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेच्या मा. नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, प्रांतपाल एमजेएफ लायन भोजराज नाईक निंबाळकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच लायन नीलम लोंढे-पाटील, ला. राजीव नाईक निंबाळकर, मनुभाई पटेल, प्रमोद निंबाळकर, डॉ. सौ. पूनम पिसाळ, विकास काकडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या दांडिया स्पर्धेसाठी प्रवेश फी १०० रूपये राहणार असून त्यासाठी ८३२९३६८७५१ व ९३५९३८२०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लायन्स लब प्लॅटिनमच्या सचिव ला. सौ. ऋतुजा गांधी, अध्यक्षा ला. सौ. वैशाली चोरमले, खजिनदार ला. सौ. सुजाता यादव यांनी केले आहे.

दरम्यान दांडिया स्पर्धेचे बक्षीस वितरण स्पर्धेनंतर लगेचच केले जाणार आहे.


Back to top button
Don`t copy text!