
आऊटपेशंट डिपार्टमेंट (ओपीडी) कव्हरेज हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्समध्ये आवश्यक बाब म्हणून समोर आले आहे, जे आऊटपेशंट वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक संरक्षण प्रदान करते. प्रामुख्याने हॉस्पिटलायझेशनवर लक्ष केंद्रित करणार्या पारंपारिक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीपेक्षा ओपीडी कव्हरेज वेगळे आहे. ओपीडी कव्हरेज कन्सल्टेशन्स, निदान चाचण्या आणि किरकोळ उपचारांसारख्या विस्तृत श्रेणीच्या आरोग्यसेवा संबंधित गरजा पूर्ण करते. हे केवळ आरोग्यसेवेची उपलब्धता वाढवत नाही तर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 ड अंतर्गत कर लाभ देखील प्रदान करते, ज्यामुळे सर्वसमावेशक आरोग्य नियोजनात एक मौल्यवान भर ठरते.
ओपीडी कव्हरेज म्हणजे काय?
हेल्थ इन्श्युरन्सची रचना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीच्या आर्थिक संकटांपासून व्यक्तीला सुरक्षित ठेवण्यासाठी केलेली आहे. या पॉलिसी विविध प्रकारांमध्ये येतात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या विशिष्ट गरजांवर आधारित एक पॉलिसी निवडता येते, जी तुम्हाला स्वत:ला आणि तुमच्या कुटुंबाला कव्हर करते. जर परवडणारी क्षमता हा मुद्दा असेल तर ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स कॅल्क्युलेटर तुम्हाला प्रीमियमचा अंदाज घेण्यास आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकते.
ओपीडी कव्हरेज हॉस्पिटलायझेशनच्या बाहेरील वैद्यकीय खर्चावर लक्ष केंद्रित करते. यामध्ये कन्सलटेशन, निदान चाचण्या, प्रीस्क्रिप्शन औषधे आणि रात्रभर राहण्याची आवश्यकता नसलेल्या किरकोळ प्रक्रियांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, किरकोळ शस्त्रक्रिया किंवा विशेष निदान चाचणी ओपीडी सुविधेमध्ये हाताळली जाऊ शकते, त्यानंतर रुग्ण त्याच दिवशी घरी परत जाऊ शकतो. असे उपचार सोयीस्कर असतात, पण ते महाग असू शकतात. त्यामुळे त्यासाठी इन्श्युरन्स सहाय्याची गरज असते. तथापि, अनेक प्रमाणित हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स हे खर्च कव्हर करत नाहीत. ओपीडी कव्हर ही तफावत भरून काढते, आऊटपेशंट उपचारांसाठी आर्थिक मदत सुनिश्चित करते आणि नियमित वैद्यकीय खर्चाचा भार कमी करते.
ओपीडी कव्हरेजचे फायदे
ओपीडी कव्हरेज अनेक लाभ देऊ करते, ज्यामुळे ते तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पोर्टफोलिओमध्ये एक फायदेशीर भर ठरते, जसे की:
1. खिशातून कमी खर्च
ओपीडी कव्हरेज असल्याने नियमित आरोग्यसेवेचा खर्च लक्षणीयरित्या कमी केला जातो. यामुळे व्यक्तींना आर्थिक तणावाची चिंता न करता वेळेवर वैद्यकीय सेवा मिळवण्याची संधी मिळते. कन्सल्टेशन असो, निदान चाचणी असो किंवा प्रीस्क्रिप्शन औषधे असो, ओपीडी कव्हर आर्थिक सहाय्य प्रदान करते, ज्यामुळे चांगल्या आरोग्य व्यवस्थापनाला प्रोत्साहन मिळते.
2. सर्वसमावेशक कव्हरेज
ओपीडी इन्श्युरन्समध्ये हॉस्पिटलायझेशन सोबतच डेंटल केअर, डोळ्यांची तपासणी, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी आणि काही लसीकरण यासारख्या सेवांचा समावेश होतो. हा सर्वसमावेशक दृष्टीकोन आरोग्यसेवेची उपलब्धता सुधारतो आणि व्यक्तींना नियमित वैद्यकीय तपासणीला प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित करतो.
3. कर लाभ
प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 डी अंतर्गत, ओपीडी कव्हरेजसह हेल्थ इन्श्युरन्ससाठी भरलेले प्रीमियम, कर कपातीसाठी पात्र आहेत. यामुळे केवळ करपात्र उत्पन्न कमी होत नाही तर व्यक्तीला हेल्थ इन्श्युरन्समध्ये गुंतवणूक करण्यास देखील प्रोत्साहित केले जाते, ज्यामुळे दीर्घकालीन बचत होते.
4. सोयीस्कर आरोग्यसेवा उपलब्धता
ओपीडी कव्हरेज आऊटपेशंट उपचारांच्या खर्चाविषयीची चिंता दूर करून सक्रिय आणि प्रतिबंधात्मक काळजी घेण्यास उपयुक्त ठरते. किरकोळ समस्या गंभीर होण्यापासून रोखण्यासाठी, व्यक्तींनी त्वरित वैद्यकीय मदत घेण्याची शक्यता जास्त असते.
ओपीडी कव्हरेज निवडण्यापूर्वी विचारात घेण्याचे प्रमुख घटक
कव्हरेज मर्यादा: विविध आऊटपेशंट उपचारांसाठी कमाल कव्हरेज रक्कम तपासा.
वगळणूक: पॉलिसीमध्ये काय कव्हर होत नाही हे लक्षात घ्या, जसे की आवश्यक नसलेले किंवा प्रयोगात्मक उपचार.
प्रीमियम खर्च: वैद्यकीय खर्चावर संभाव्य बचतीसह अतिरिक्त प्रीमियम खर्चाची तुलना करा.
ओपीडी कव्हरेज आधुनिक हेल्थ इन्श्युरन्स नियोजनाचा अविभाज्य भाग बनले आहे. नियमित वैद्यकीय खर्च कव्हर करण्याची क्षमता चांगल्या आरोग्यसेवा उपलब्धता आणि सक्रिय आरोग्य व्यवस्थापनाला प्रोत्साहन देते. याव्यतिरिक्त, कलम 80 ड अंतर्गत कर लाभ व्यक्तींना सर्वसमावेशक हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्समध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देते, ज्यामुळे आर्थिक आणि आरोग्यसेवा विषयक दोन्ही परिणाम अनुकूल होतात. ओपीडी कव्हरेजसह, व्यक्ती विशिष्ट आरोग्यसेवेच्या गरजांवर आधारित त्यांच्या पॉलिसीला कस्टमाईज करू शकतात, ज्यामुळे परवडणारी आणि सोयीस्कर सुविधा सुनिश्चित होते. ही लवचिकता केवळ अनपेक्षित वैद्यकीय खर्चापासून संरक्षित करत नाही तर नियमित वैद्यकीय खर्च कव्हर केले जातात, ज्यामुळे मनःशांती देखील मिळते.
जर तुम्हाला शक्य असेल तर, कुटुंब किंवा तरुण व्यक्तीला सोय आणि वेळेची बचत आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत नियमित तपासणी आणि आजाराचे व्यवस्थापन करण्याची सुविधा देणारे कव्हर जोडण्याचा विचार तुम्ही करावा.
भास्कर नेरुरकर, हेड हेल्थ डमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स