मंगळवार पेठेत पुन्हा ‘टीव्ही’ची चर्चा! २००१ च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? प्रभाग २ (अ) मध्ये सोनू संग्राम अहिवळेंना मिळाले ‘दूरदर्शन संच’ चिन्ह


  • २००१ साली मंगळवार पेठेतून अपक्ष उमेदवार आशिष अहिवळे ‘टीव्ही’ चिन्हावर लढले होते; आता तोच योग जुळून आला

  • प्रभाग क्र. २ (अ) मधून उच्चशिक्षित व राज्यस्तरीय हॉकी खेळाडू सोनू अहिवळे अपक्ष रिंगणात

  • वारसा समाजसेवेचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे यजमानपद भूषविणाऱ्या घराण्याची स्नुषा

स्थैर्य, फलटण, दि. 27 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत चिन्हांचे वाटप झाल्यानंतर आता जुन्या आठवणींना उजाळा मिळू लागला आहे. प्रभाग क्रमांक २ (अ) अनुसूचित जाती (महिला) राखीव जागेवरून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असलेल्या सौ. सोनू संग्राम अहिवळे यांना ‘दूरदर्शन संच’ (TV) हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. विशेष म्हणजे, २००१ साली मंगळवार पेठेतूनच अपक्ष निवडणूक लढवलेले आशिष अहिवळे यांचेही चिन्ह ‘टीव्ही’ हेच होते. त्यामुळे मंगळवार पेठेत पुन्हा एकदा २००१ च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आणि मतदारांमध्ये रंगू लागली आहे.

राजकीय आणि ऐतिहासिक वारसा

सोनू अहिवळे या केवळ उमेदवार नसून त्यांना मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यांचे आजेसासरे कालकथित नाना पांडुरंग अहिवळे हे फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक होते. विशेष म्हणजे, २३ एप्रिल १९३९ रोजी जेव्हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फलटणमध्ये आले होते, तेव्हा त्यांना मंगळवार पेठेत निमंत्रित करून कार्यक्रम घेण्याचे ऐतिहासिक कार्य नाना अहिवळे यांनी केले होते. तोच समाजहिताचा वसा आणि वारसा पुढे चालवण्यासाठी सोनू अहिवळे रिंगणात उतरल्या आहेत.

उच्चशिक्षित आणि खेळाडू नेतृत्व

सोनू अहिवळे या बी.ए. (हिस्ट्री) आणि एम.ए. शिक्षण घेत असून त्या राज्यस्तरीय हॉकी खेळाडू आहेत. सुशिक्षित आणि खेळाडू वृत्तीचे नेतृत्व प्रभागाला मिळावे, अशी मतदारांची भावना आहे.

पती संग्राम अहिवळेंची भक्कम साथ आणि विकासकामे

सोनू अहिवळे यांचे पती संग्राम अहिवळे हे २००६ पासून राजे गटाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शहर स्वच्छतेसाठी ३ वर्षे नगरपालिकेत ठेकेदार म्हणून काम पाहिले आहे. गेल्या काही वर्षांत या दाम्पत्याने प्रभागात अनेक विकासकामे स्वखर्चाने केली आहेत:

  • शैक्षणिक: मंगळवार पेठ शाळा क्र. ३ साठी पाण्याची मोटर आणि A.I.M. संस्थेमार्फत मोफत क्लासेस.

  • आरोग्य: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासमोर सॅनिटरी नॅपकिन मशीनची भेट.

  • सामाजिक: एकता गणेशोत्सव मंडळाला कायमस्वरूपी लोखंडी स्टेज आणि फर्निचर.

  • क्रीडा: युवकांच्या मागणीनुसार क्रिकेटचे किट वाटप.

  • पायाभूत सुविधा: समाज मंदिर ते मधुकर काकडे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता तयार केला.

भीम फेस्टिव्हलचे भव्य आयोजन

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाननिमित्त आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ‘भीम फेस्टिव्हल २०२५’ चे आयोजन करून अहिवळे कुटुंबियांनी आपली सामाजिक बांधीलकी सिद्ध केली आहे.

मतदारांना आवाहन

“माझे सासर आणि माहेर दोन्ही मंगळवार पेठेतच असल्याने मी या मातीशी जोडलेली आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास, स्वच्छ पाणी आणि महिला सक्षमीकरणासाठी मला ‘दूरदर्शन संच’ (T.V) या चिन्हावर मतदान करून सेवेची संधी द्यावी,” असे आवाहन सौ. सोनू संग्राम अहिवळे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!