स्थैर्य, मुंबई, दि.६: सोमवारपासून रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यात आले. पण कर्मचारी कमी असल्याने अनेक रेस्टॉरंट सुरू झाले नाही. केवळ ३० टक्के रेस्टॉरंट आणि बार सुरू झाले आहेत. पहिल्या दिवशी ३५ ते ४० टक्के ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला, अशी माहिती ‘आहार’ने दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितपणे बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारपासून ‘मिशन बीगिन अगेन’ अंतर्गत रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. राज्यात इतर जिल्ह्यांत ५० टक्के आसन क्षमतेसह तर मुंबईत ३३ टक्के क्षमतेसह रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहेत. १ नोव्हेंबरपासून ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू केले जातील.
याबाबत आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले, ग्राहकांनी आज जो प्रतिसाद दिला तसेच सात महिन्यांनंतर पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार मानतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमावलीचे पालन करीत असताना ग्राहक अत्यंत संयमाने सामोरे गेले. नियमावली केवळ ग्राहकांसाठीच नाही, कर्मचा-यांसाठीही हितकारक आहे. अपेक्षेप्रमाणे आज ३० ते ३५ टक्के रेस्टॉरंट आणि बार सुरू झाले आहेत. यापैकी कित्येक ठिकाणी तर ३० ते ४० टक्के कर्मचारी उपलब्ध आहेत. पहिल्या दिवशी ५० टक्के ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला आहे.अपुºया मनुष्यबळामुळे मेन्यूची संख्या कमी केली आहे. रेस्टॉरंट आणि बारची वेळही कमी केली आहे. पण येत्या १५ दिवसांत सर्व पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे.
रेस्टॉरंट चालकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. पार्सलमध्ये २५ टक्के घटकोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद होते. त्यामुळे खाद्यपदार्थ केवळ पार्सल देण्यात येत होते. पण सोमवारी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये बसून जेवता येत आहे. त्यामुळे जेवण पार्सल नेण्याच्या प्रमाणात २५ टक्के घट झाली, अशी माहिती आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी दिली.
तसेच रेस्टॉरंट आणि बार रात्री १.३० वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. मात्र रात्री १२.३० वाजेपर्यंतच खाद्यपदार्थ आणि मद्यपानासाठी शेवटची ऑर्डर करता येणार आहे, अशी माहिती ‘आहार’ने दिली.