स्थैर्य, फलटण, दि. २७ : सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी ऑनलाईन ग्रामसभा घेण्याबाबत नुकतेच आदेश पारित केलेले होते. त्या नुसार फलटणचे उपनगर समजले जाणाऱ्या कोळकी ग्रामपंचायतीची ग्रामसभा हि दि. ३१ मे २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेली आहे. तरी कोळकी गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन ग्रामसभेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन कोळकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय कामठे यांनी केलेले आहे.
कोळकी ग्रामपंचायतीची ग्रामसभा हि ऑनलाईन म्हणजेच गुगल मीटच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे. ग्रामसभेच्या सदस्यांनी गावांच्या विकासात सहभागी व्हावे. याशिवाय ग्रामसभेने, ग्रामपंचायतीने वर्षभरात गावांच्या विकासाची जी कामे केली असतील त्यांची माहिती व आढावा घ्यावा. ग्रामपंचायतीने पुढील वर्षी विकासाची जी कामे करावयची ठरविले असेल त्यांची माहिती घ्यावी. गावातील नागरिकांना ज्या शंका आल्या असतील त्या शंका जाणून घ्याव्यात आणि त्या शंकांना ग्रामपंचायतीने जी उत्तरे दिली असतील ती उत्तरे समजून घ्यावीत. ग्रामपंचायत करीत असलेल्या कारभाराची प्रश्न विचारून माहिती घ्यावी आणि ग्रामपंचायतीला सूचना कराव्यात, असेही आवाहन कोळकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय कामठे यांनी केलेले आहे.
तरी कोळकी गावामधील सर्व ग्रामस्थांनी दि. ३१ मे २०२१ रोजी पुढील गुगल मीट लिंक द्वारे https://meet.google.com/tmz-aodd-udt ग्रामसभेत सहभागी व्हावे. ग्रामसभेत सहभागी होण्यासाठी गुगल मीट हे अँप्लिकेशन डाउनलोड करावे.