दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी एकूण कांद्याची आवक १४०८ क्विंटल झाली. लाल कांदा दर रु. १५०० ते ३७०० व गरवा कांदा दर रु. २००० ते ४४०१ प्रति क्विंटलपर्यंत निघाल्याचे समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
मे. घडिया ब्रदर्स यांचे अडतीवर श्री. शिवाजी दगडू बोराटे, रा. पिंप्रद यांच्या कांद्याला रु. ४४०१ प्रति क्विंटल इतका उच्चांकी भाव मिळाला असून मे. धनेश ट्रेडर्स यांनी खरेदी केला आहे, अशी माहिती समितीचे व्हा. चेअरमन श्री. भगवानराव होळकर यांनी दिली.
शेतकर्यांनी कांदा वाळवून प्लास्टिक पिशवीत न भरता नवीन सुतळी गोणीमध्ये आणावा, म्हणजे जास्तीत जास्त भाव मिळेल, असे आवाहन समितीचे सचिव श्री. शंकरराव सोनवलकर यांनी केले आहे.