दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | सातारा | वाटेत थांबलेल्या चार युवकांना काय झालं, असे विचारल्याच्या कारणावरून एका युवकाचा बुक्कीनेदात पाडल्याची घटना लिंब, ता. सातारा येथे दि. 26 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणीचौघांवरसातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शुभम बरकडे, ओंकारशिदे (दोघे रा. लिंब, ता. सातारा.) यादोघांसह दोन अनोळखी मुलांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. याबाबत पोलिसांनीदिलेेलीमाहिती अशी, अजित दिलीप जाधव (वय23 रा. गोवे, ता. सातारा) हा लिंबमधील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरून चालत जात होता. त्यावेळी वाटेत शुभम आणि ओंकार यांच्यासह दोन अनोळखी मुले तेथे उभी होती. अजित जाधवने या मुलांना पाहून काय झालं, असं विचारलं. या कारणावरून चौघे अजितच्या अंगावर धाऊन गेले. धक्काबुक्की करून ओंकार शिंदे याने तेथेच पडलेले लाकडी दांडके हातात घेऊन अजितच्या पाठीवर मारले. शुभम बरकडे याने अजितच्या दातावर बुक्की मारून त्याचा दात पाडला. त्याच्या दातातून रक्तस्त्राव होऊ लागला तरी त्याला हेसर्वजण मारहाण करत होते. याप्रकारानंतर त्याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत संबंधितांना अटक झाली नव्हती.