
दैनिक स्थैर्य | दि. १५ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
खडकी (ता. फलटण) येथे उसात दगड का टाकताय, असे विचारल्याच्या कारणावरून वडिलांस मारहाण केल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यात मिळालेली माहिती अशी, मंगळवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सागर नानासो कर्णवर (राहणार खडकी, तालुका फलटण) व फिर्यादीचे वडील नानासो कर्णवर हे जमीन गट नंबर २५५ मध्ये असलेल्या उसाचे शेतात गेले असता यातील आरोपी बबन बजू कर्णवर हा उसात दगड टाकत असताना त्याला फिर्यादी व फिर्यादीच्या वडिलांनी दगड का टाकताय, असे विचारल्याच्या कारणावरून आरोपी बबन बजू कर्णवर याने फिर्यादीचे वडील नानासो यांचे अंगावर धावून जाऊन शिवीगाळ करून फिर्यादीला हातातील कुर्हाडीचे दांड्याने मारल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
या प्रकरणी आरोपी बबन कर्णवर याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खाडे करत आहेत.