दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२२ । फलटण । कोरोना ह्या वैश्विक महामारीच्या काळामध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागलेले आहेत. त्यासोबतच ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणामध्ये अनेक बदल होत आहेत. विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार फलटणचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरामध्ये एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आलेला आहे. याची सुरवात दि. २५ फेब्रुवारी रोजी मंगळवार पेठ येथून होणार आहे. फलटण शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सनी अहिवळे यांनी केलेले आहे.
दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे व फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सनी अहिवळे यांनी दिली.