
दैनिक स्थैर्य | दि. १३ जुलै २०२३ | फलटण |
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आवाहनानुसार व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यात एक लक्ष वृक्ष लागवड करण्याचा निर्णय झाला आहे. त्याअंतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटी व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण तालुक्यातील मांडवखडक, सस्तेवाडी, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण या ठिकाणी विविध प्रकारच्या एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवडीत महोगणी, बहावा, काटेसावर, चिंच, खैर, कडुनिंब, वड, सीसो, कांचन, करंज इ. वृक्षांचा समावेश आहे.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाविद्यालय समितीचे व्हा.चेअरमन श्री. शरदराव रणवरे, महाविद्यालयीन समिती सदस्य श्री. रणजित निंबाळकर, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, शेती विभागाचे अधीक्षक श्री. राजेंद्र पवार प्रा. ए. डी. पाटील, प्रा. ए. एम. घनवट, दोन्ही महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. तरटे व प्रा. एम. एस. बिचुकले आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.