एस टी च्या चाकाखाली येऊन एकजण ठार तर एकजण जखमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑगस्ट २०२२ । फलटण । फलटण येथील फलटण ते सातारा रस्त्यावर बाणगंगा नदीचे पुलावर मोटारसायकला ब्रेक मारल्याने खडी वरुन मोटार सायकल घसरून एकजण एस.टी. बसच्या मागील चाकाखाली येऊन एकजण ठार झाला आहे तर एकजण जखमी झाला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी रूपेश राजेंद्र फरांदे ( वय १९ वर्षे, व्यवसाय- शिक्षण, राहणार फरांदवाडी गेस्ट हाऊसचे जवळ ता. फलटण ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.१५ वाजणेच्या सुमारास फिर्यादी व त्याचे चुलते नवनाथ भिवा फरांदे हे त्यांच्या मोटार सायकल क्रमांक MH – 11 – BF – 8544 वरून मुधोजी काॅलेजला जात असताना फलटण ते सातारा जाणारे रस्त्यावर बाणगंगा नदीचे पुलावर समोरून एक वाहन एस. टी. बसला ओव्हरटेक करून मोटार सायकल च्या अंगावर आल्याने फिर्यादी यांच्या चुलते यांनी मोटार सायकलचा ब्रेक दाबल्याने मोटार सायकल खडीवरून घसरल्याने मोटार सायकल सह फिर्यादी यांचे चुलते व फिर्यादी खाली पडून घसरत जावून फिर्यादी यांचे चुलते एस. टी. बसचे पाठीमागील चाकाखाली गेल्याने त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी होवून मयत झाले व फिर्यादी जखमी झाले आहेत.

अपघातानंतर एस.टी बस निघून गेली आहे. सदरचा अपघात मयत नवनाथ भिवा फरांदे यांनी हयगयीने, अविचाराने, निष्काळजापणे मोटार सायकल चालवून व ब्रेक मारल्याने घसरत जावून एस. टी. बसचे पाठीमागील चाक डोक्यावरून गेल्याने ते मयत झाले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!