पाकिस्तानातून मिळाले होते स्फोटकं लावण्याचे निर्देश, 6 किलो IED सह एकाला अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, जम्मू, दि.१५:  पुलावामा हल्ल्याच्या दुसऱ्या स्मृतिदिनी सुरक्षादलाने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट रचला होता. जम्मू बस स्टँडवरुन सुरक्षादलाने रविवारी जवळपास 6 किलो इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस (IED) जप्त केले. सुरक्षादलाने संपूर्ण बस स्टँडवर सर्च ऑपरेशन केले. पोलिसांनुसार पाकिस्तानचा सपोर्ट करणारी दहशतवादी संघटना अल बद्रने पुलवामा हल्ल्याच्या दुसऱ्या स्मृतिदिनी हा ब्लास्ट करण्याचा कट रचला होता.

जम्मू पोलिसांचे IG मुकेश सिंह यांनी सांगितले की, 3 दिवसांपासून पोलिस अलर्ट होते. माहिती मिळाली होती की, पुलवामा हल्ल्याच्या स्मृतिदिनी दहशतवाही संघटना काही तरी मोठे करण्याचा प्लान करत आहे. या वेळी स्फोट हा जम्मूमध्ये होणार होता.

पाकिस्तानातून मिळाले होते IED लावण्याचे निर्देश
IG यांनी सांगितले की, शनिवारी रात्री आम्ही गस्त घालताना सोहेल नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. त्याच्या बॅगमधून 6-6.5 किलोची IED जप्त करण्यात आली. ही अॅक्टिव्ह नव्हती. सोहेलने सांगितले की, तो चंदीगडमध्ये शिकला आहे. तो पाकिस्तानमधील अल बद्रच्या निर्देशावर IED प्लांट करण्यासाठी आला होता.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, सोहेलला IED प्लांट करण्यासाठी 3-4 टार्गेट देण्यात आले होते. त्याला रघुनाथ मंदिर, बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि लखदाना बाजारमधून एका ठिकाणी स्फोटकं ठेवायची होती. यानंतरर तो फ्लाइटने श्रीनगरला जाणार होता. तिथे अल बद्रचा अख्तर शकील खान नावाचा एक ग्राउंड वर्कर त्याला घ्यायला आला असता. यानंतर सोहेल त्याच्यासोबत अॅक्टिव्ह झाला असता.

या कटाची माहिती चंदीगडचा एक तरुण काजी वसीमला होती. त्यालाही पकडण्यात आले आहे. दहशतवाद्यांचा अजून एक साथीदार आबिद नबीलाही अटक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त शनिवारी रात्री उशीरा सांबाच्या झांग येथून 6 पिस्तूल आणि 15 छोटे IED ही जप्त करण्यात आले आहेत. याचा तपास सुरू आहे.


Back to top button
Don`t copy text!