
दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । फलटण । गेल्या दोन दिवसांपूर्वी बिबी मध्ये दुर्दैवी घटना घडली. शाळेमध्ये जात असताना अज्ञात गाडीतून पडून प्राजक्ता या तरुणीचा अपघात झाला तिच्या डोक्याला जास्त मार लागल्याने तिला मंगलमूर्ती हॉस्पिटल सातारा या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. परंतु ग्रामस्थांच्या एकीमुळे तिचा जीव वाचला असल्याची चर्चा रंगत आहे.
तिचे वडील गणपत भोसले यांचे अर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने, बिबी गावातील सर्व ग्रामस्थांनी ती बरी व्हावी याचा निश्चय केला. गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन थोडी थोडी सर्वांकडून देणगी जमा केली. आणि ती देणगी तिच्या उपचारासाठी देण्यात आली. यामुळे गावच्या एकीमुळे तरुणीचा जीव वाचल्याची चर्चा रंगत आहे.